उपरोक्त पंक्ती ‘योगी सर्वकाळ सुखाचा’ या अभंगातील असून, त्या संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहेत. त्यांनी योगी पुरूषाची तुलना पाण्याशी करून योगी पुरूष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे. एकनाथांनी योग्यांची तुलना पाण्याशी केली आहे, पण योगी पाण्यापेक्षा अतिश्रेष्ठ कसे हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते. सर्वलोक तृप्त होतात. त्याप्रमाणे योगी सर्वश्रेष्ठ असून ते केवळ लोकांकरीता उच्च लोकांतून इहलोकात खाली येतात. जन्म घेऊन हालअपेष्टा भोगतात ते केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हालअपेष्टा भोगतात. कीर्तन कथेच्या माध्यमातून जनाना (लोकांना) संतुष्ट करतात. आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतात.